Tuesday, April 23, 2024
Homeनगरदोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसासह दोघांना अटक

दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसासह दोघांना अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील संजयनगर येथे विक्री करण्याच्या उद्देशाने दोन गावठी कट्टे (Gavathi Katta) व आठ जिवंत काडतुस (Cartridge) अवैधरित्या बाळगणार्‍या दोघा जणांना पोलिसांच्या (Police) पथकाने 52 हजार 400 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद (Arrested) केले. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) ही कारवाई केली. यावेळी अन्य दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालावर आ. बाळासाहेब थोरात म्हणाले शिंदे फडणवीस सरकार हे..

या कारवाईत अक्षय राजु फुलारे (वय 2) व शहेबाज युनूस पटेल (वय 30, दोघे रा. संजयनगर, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून शहारुख युनूस पटेल (रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर) व फिरोज इब्राहिम पठाण (रा. शनिचौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

मक्याच्या शेतातील गांजाची 335 झाडे जप्त

पोलीस अधिक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे बाळगणार्‍यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार श्री. आहेर जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, श्रीरामपूर (Shrirampur) येथील संजयनगर परिसरात गावठी कट्टे (Gavathi Katta) व जिवंत काडतुस (Cartridge) जवळ बाळगणारे दोन इसम विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने श्री. दिनेश आहेर यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन मिळालेल्या माहितीनुसार खात्री करुन कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.

संगमनेरातील ‘त्या’ 57 स्टोन क्रेशर मालकांना पुन्हा नोटीस

त्यानुसार या पथकातील पोलीस उपनिरिक्षक तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, सागर ससाणे व किशोर शिरसाठ यांनी मिळून संजयनगर, वॉर्ड नं.2 श्रीरामपूर येथील बर्फाचे कारखान्याजवळ सापळा लावला. थोड्याच वेळात त्यांना चार इसम संशयीतरित्या बोलताना दिसले. पोलीस पथकाची खात्री होताच लागलीच दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले व दोन इसम गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेले.

त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी अक्षय राजु फुलारे (वय 2) व शहेबाज युनूस पटेल (वय 30, दोघे रा. संजयनगर, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगीतले. दोघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे व आठ जिवंत काडतूस असा एकूण 52 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. यावेळी शहारुख युनूस पटेल (रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर) व फिरोज इब्राहिम पठाण (रा. शनिचौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

करजगाव-अंमळनेर येथील वाळू लिलाव व डेपो लिलाव बंद करण्यासाठी बेमुदत उपोषण

अक्षय राजु फुलारे व शहेबाज युनूस पटेल या देघांकडे दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रणजित पोपट जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पो. स्टे. येथे गु. र. नं. 447/23 आर्म ऍक़्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन (Shrirampur Police Station) करीत आहे. यातील शहेबाज युनूस पटेल हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द लोणी (Loni) व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग, गंभीर दुखापत व इतर कलमान्वये तीन गुन्हे दाखल आहेत.

प्राथमिक शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागातील 97 कर्मचार्‍यांच्या बदल्या

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.

साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तामिळनाडूची आघाडी

- Advertisment -

ताज्या बातम्या