Sunday, May 5, 2024
Homeनगरगौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

घारगाव | प्रतिनिधी

‘सबसे कातील गौतमी पाटील’ रोजच चर्चेत असते. गौतमीने फार कमी वेळेत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. गौतमी आपल्या गावात येणार म्हटल्यावर कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरू होते. अगदी लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो.

- Advertisement -

गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे गौतमीचा जिथे कार्यक्रम होतो, तिथे कुरबूर होतेच होते. मोजके अपवाद सोडले, तर गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतोच. पण, आता गौतमीच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आहे संगमनेर तालुक्यातील म्हसवंडीतील. गौतमीने स्टेजवरून खाली उतरून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला, मुलींसोबत ठेका धरला.

Akola Violence : अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक अन् जाळपोळ… एकाचा मृत्यू, कलम १४४ लागू

संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे कला व सास्कृतिक मोहोत्सव निमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शनिवारी (१३ मे) रोजी आयोजन करण्यात आले होते. नेहमी स्टेजवर आपल्या डान्सनं सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलनं यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली. याकार्यक्रमावेळ महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं. गौतमीनं फिल्मी अंदाजात एंट्रीने महिलांनी देखील ठेका घरला. मात्र या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलच्या शोची वेगळीच चर्चा रंगली होती. हा कार्यक्रम कुठलाही तंटा, भांडणे न होता निर्विघ्न पार पडला. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

म्हसवंडी म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले गाव होय. येथे कला व सास्कृतिक मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रील स्टार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलच्या आतापर्यंत जवळपास सर्व कार्यक्रमामध्ये राडा होताना पाहायला मिळाला. कुठेही कार्यक्रम असला की कार्यक्रम मधूनच बंद करायला लागत असे मात्र या कार्यक्रमात मात्र संपूर्ण गावाने सहभाग घेत तिच्या कार्यक्रमाला दाद दिली. गौतमी नाचता नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरली.

शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या आजी देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्या होत्या. गौतमीनं स्टेजवरून प्रेक्षकांमध्ये एंट्री घेतली. गौतमी खाली उतरताच महिला प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. स्टेजवरून खाली उतरताच गौतमीनं चंद्रा गाण्यावर ठेका धरला. चंद्रा गाण्यावर बेधुंद नाचणाऱ्या गौतमीसमवेत शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या यांनीही ठेकाधरत नाचायला सुरवात केली. त्यांना आवराण्यात घारगाव पोलिसांना तर दमछाक झाली. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन केलं होतं.

सचिन तेंडुलकरने मुंबई क्राईम ब्रॅंचकडे दाखल केली FIR, काय आहे प्रकरण?

या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. ग्रामस्थांचं योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळं गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला. म्हसवंडीतील कार्यक्रमात कसल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या