Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIPL 2022 : गौतम गंभीरला आयपीएलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी

IPL 2022 : गौतम गंभीरला आयपीएलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) नव्याने सहभागी होणाऱ्या लखनौ संघाने (Lucknow team) भारताचा माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) आपल्या संघाचा मार्गदर्शक (mentor) म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएल इतिहासात गंभीर प्रथमच मार्गदर्शक म्हणून एका संघासाठी काम करणार आहे…

- Advertisement -

शुक्रवारी लखनौ संघाने झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील डावखुरे फलंदाज अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका (sanjeev goenka) गौतम गंभीरला संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमण्यास उत्सुक आहेत.

गौतम गंभीरने २०१२-२०१४ साली कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला आपल्या नेतृत्वात आयपीएल (IPL) स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिले आहे. कोलकाता व्यतिरिक्त गंभीरने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.

आयपीएलमध्ये (IPL) कर्णधार (Captain) म्हणून १२९ सामने त्याने खेळले असून, यात ७१ सामन्यांमध्ये त्याला संघाला विजय मिळवून देण्यात आपल्या नेतृत्वात यश आले आहे.

लखनौ संघ आरपी संजीव गोयंका ग्रुपने ७,०९० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. आणि ५ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर एका नव्या संघासह ते स्पर्धेमध्ये उतरत आहेत. २०१६-२०१७ या दोन हंगामासाठी गोयंका ग्रुपकडे रायझिंग पुणे सुपरजायंट हा संघ होता.

भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या (mahendra singh dhoni) नेतृत्वात भारतीय संघाने २००७ चा दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) पहिला टी २० वर्ल्डकप (T20 World Cup) आणि २०११ चा ५० षटकांचा वनडे वर्ल्डकप (One Day World Cup) जिंकला होता. या विजयात गौतम गंभीरची गंभीरची फलंदाजी महत्वपूर्ण ठरली होती.

टी २० वर्ल्डकप २००७ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) ७५ आणि २०११ च्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) अंतिम सामन्यात ९१ धावांची संयमी खेळी करून भारताच्या (India) विजयाचा पाया मजबूत केला होता.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या