Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशअदानी साम्राज्याला धक्का; हिंडेनबर्गच्या अहवालानंतर मोठा फटका !

अदानी साम्राज्याला धक्का; हिंडेनबर्गच्या अहवालानंतर मोठा फटका !

नवी दिल्ली | New Delhi

गौतम अदानी  (Gautam Adani) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत गौतम अदाणी आणि हिंडेनबर्गने संशोधन अहवाल (Hindenburg Research Report) नुकताच जाहीर केला. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले पहाटेचा शपथविधी हा….

कारण या संशोधन अहवालामध्ये गौतम अदाणी  (Gautam Adani) आणि त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप (Accusation) करण्यात आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गौतम अदाणींची (Gautam Adani) थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. एवढंच नाही, तर एका दिवसात त्यांच्या बाजारातील भांडवलाचा आकडा 80 हजार 078 कोटींचा फटका बसून 18 लाख 37 हजार 978 कोटींवर आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा, म्हणाले..

महत्त्वाची बाब म्हणजे 27 जानेवारी रोजी अदाणी उद्योग समूहाचे FPO बाजारात लाँच होत असून त्याच्या आधी अदाणींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. यातच अदानी समूहाकडून हंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया आली आहे. सोबतच संबंधित अहवालाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी चाचपणी सुरु असल्याचेही समूहाने म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

नेमकं घडलं काय ?

न्यूयॉर्कमधील ( New York) संशोधन संस्था  Hindevburg Research नं गौतम अदाणींच्या कंपन्यांवर बुधवारी गंभीर आरोप केला. अदाणींच्या कंपन्यांकडून शेअर मार्केटमध्ये (Share Market) हस्तक्षेप करण्यात येत असून गेल्या काही दशकांपासून त्यांच्याकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोप हिंडनबर्ककडून (Hindenburg)अदाणींवर करण्यात आला आहे. याचे तीव्र पडसाद बाजारपेठेत दिसून आले असून एका दिवसात अदाणींना तब्बल 80 हजार कोटींच्या बाजार भांडवलाचा फटका बसला आहे.

अदाणींच्या FPO ला फटका बसणार ?

दरम्यान, हिंडबनर्गच्या (Hindenburg) या खळबळजनक आरोपांनंतर बाजारात येऊ घातलेल्या अदाणींच्या FPO ला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 27 जानेवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी अदाणी एंटरप्रायजेसकडून तब्बल 20 हजार कोटींचे एफपीओ खुल्या बाजारात खरेदीसाठी लाँच करणार आहेत. हा भारतातील (India) सर्वात मोठा ऋझज असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्याच्या दोन दिवस आधीच हिंडनबर्गनं हा आरोप केल्यामुळे या एफपीओला फटका बसू शकतो, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल काय सांगतो ?

या अहवालात गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर विश्लेषणात्मक टीका मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या अहवालाचे शिर्षक जर मराठीत केले तर त्याचा भावार्त जगातील सर्वत श्रीमंत असलेला तिसर्‍या क्रमांकाच व्यक्ती कॉर्पोरेट इतिहासातील कसा घोटाळा आहे. हा अहवाल सांगतो की अदानी समूह स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीत सामील आहे. या अहवालात कंपनीने फसवणूक केल्याचा थेट आरोप केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या