Friday, April 26, 2024
Homeनाशिकगौस-ए-आजम जयंती येत्या २७ नोव्हेंबरला

गौस-ए-आजम जयंती येत्या २७ नोव्हेंबरला

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी) :

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौस-ए- आजम बडेपीर साहेब यांची 11 वी शरीफचे नुकतेच चंद्रदर्शन झाले असून येत्या 27 नोव्हेंबरला मोठा सण साजरा केला जाणार आहे.

- Advertisement -

दर वर्षी भव्य जुलूस काढण्याची परंपरा असून यंदा ही परवानगी मिळाली तर जुलूस निघणार आहे. दरम्यान मुस्लिम बांधव शासनाच्या आदेशानुसार सण साजरा करतील, अशी माहिती खतीब ए नाशिक हाफिज हिसामुदिन अशरफी यांनी दिली.

जयंती निमित्त शहर परिसरात मुस्लिम बांधवांनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात चौकांमध्ये तसेच रस्त्यावर आकर्षक कमानी उभारून इस्लामी झेंडे, पताका लावण्यात येत आहेत, तसेच घरांवर, दुकानांवर विद्युतरोषणाई करण्यात आली. धार्मिक स्थळा देखील सजविण्यात आले आहेत.

बाजारात सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहेत. यंदा नवीन काही बाजारात उपलब्ध नसले तरी मागील वर्षापासून जे साहित्य मिळत होते, त्याची खरेदी जोरात सुरू आहे.

तीस रुपयापासून सुमारे तीनशे रुपये पर्यंत हिरवे, लाल तसेच धार्मिक स्थळांचे फोटो असलेले झेंडे विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या