Wednesday, April 24, 2024
Homeनगरगौरी गडाख घरात मृतावस्थेत आढळल्या

गौरी गडाख घरात मृतावस्थेत आढळल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जेष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सून गौरी प्रशांत गडाख (वय- 38) या नगर शहरातील यशवंत कॉलनी येथील घरामध्ये मृत अवस्थेत आढळून आल्या.

- Advertisement -

ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत यशवंत कॉलनी येथील घरी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरुण मुलाणी व पोलीस कर्मचारी पंचनामा करत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या