Saturday, April 27, 2024
Homeनगरसोनपावलांनी लक्ष्मी आल्या घरोघरी

सोनपावलांनी लक्ष्मी आल्या घरोघरी

पारनेर | तालुका प्रतिनिधी

लाडक्या गणरायाचे (God Ganesh) पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन झाले आहे. महिलांनी परंपरेनुसार मुहूर्तावर विधीवत पुजनाने गौरींचे स्वागत केले.

- Advertisement -

गौरी/महालक्ष्मी हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय सण आहे. विशेषतः महिलांचा आवडता असलेला हा सण भाद्रपद महिन्यात तीन दिवस असतो. राज्यातील प्रांतानुसार यात काही बदल दिसून येतात. कोकणात खड्यांच्या गौरी असतात तर उर्वरित महाराष्ट्रात महालक्ष्मी मूर्ती असतात. यात काही हातांच्या, काही बिन हातांच्या, काही उभ्या, काही बसलेल्या, नवसाच्या, माहेरहून मिळालेल्या असे अनेक प्रकार असतात. सुंदर मुखवटे, देखणी आरास, रुचकर खाद्यपदार्थ, विविध दागिन्यांनी नटवलेल्या मूर्ती आणि पारंपरिक रीतिरिवाज यांमुळे तसेच काही ठिकाणी यासोबत गणेश प्रतिष्ठापना केल्याने या काळात उत्साहाला आणि आनंदाला उधाण आलेले असते.

गौरींचे आगमन भाद्रपद शुक्ल पक्षात, चंद्र ‘अनुराधा’ नक्षत्रात असतांना होते. जेष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन (भोजन) होते. म्हणून यांस जेष्ठा गौरी संबोधतात. चंद्र ‘मूळ’ नक्षत्रात असतांना गौरी विसर्जन होते. याच दिवशी दोरे घेणे देखील असते.

यावर्षी रविवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.५० वाजता चंद्र अनुराधा नक्षत्रात प्रवेश करत आहे. अर्थात सकाळी ९.५० नंतर गौरींचे आगमनाचा मुहूर्त आहे. सोमवारी, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.२३ नंतर चंद्राचा जेष्ठ नक्षत्रात प्रवेश झाल्यानंतर गौरी पूजन करावे. मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०५ नंतर दिवसभरात सूर्यास्तापूर्वी गौरी विसर्जन करावे. काही लोकांकडे पाच दिवसांचा गौरी गणेश असतो. त्यांनी याच दिवशी गौरीसोबत गणेश विसर्जन केले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या