Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेवळालीत प्रवेशासाठी पाच ठिकाणी गेट

देवळालीत प्रवेशासाठी पाच ठिकाणी गेट

देवळाली कॅम्प | Deolali Camp

कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवळालीतील बाजार भागात गर्दी होऊ नये म्हणून नाशिक शहराप्रमाणे या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पास देण्यात येत असून प्रवेशासाठी पाच ठिकाणी गेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

करोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच स्थानीक स्वराज्य संस्था सरसावल्या आहेत. पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार कॅन्टोन्मेंट प्रशासन यांनी पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार देवळालीच्या सदर बाजार भागात प्रवेश करणाऱ्या नागरिक यांचे साठी हौसन रोड, कॅन्टोन्मेंट कार्यालय व वडनेर रोड येथून प्रवेश द्वार उभारणी केली आहे.

याशिवाय कॅन्टोन्मेंट हास्यकुल व आडके नगर येथील प्रवेश गेटमधून नागरिकांना शहरात ये-जा करता येणार नाही यासाठी त्या ठिकाणी ब्यारॅकेटिंग करण्यात आले आहे. नागरिकांकरीता प्रवेश करण्यासाठी लागणारे प्रवेश पास पोलिस प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे.

प्रवेश गेटवर पोलिसांसह कॅन्टोन्मेंनच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधिक्षक राजिंदरसिंह ठाकूर यांनी दिली .

- Advertisment -

ताज्या बातम्या