गट-गणांच्या आरक्षण सोडतीला स्थगिती

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा परिषद (Zilla Parishad Nashik )व पंचायत समिती( Panchayat Samiti ) सार्वत्रिक निवडणूकांकरीता ( Election )आरक्षण सोडत ( Reservation Draw कार्यक्रम उद्या (13 जुलै 2022) रोजी घेण्यात येणार होता. सदर सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये तूर्त स्थगित करण्यात आला असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी, (पुनर्वसन) नितीन गावंडे यांनी दिली आहे.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात गावंडे यांनी नमूद केले आहे की, नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या करीता आरक्षण सोडत कार्यक्रम (आज दिनांक 13 जुलै 2022) रोजी घोषित करण्यात आला होता. परंतू राज्य निवडणूक आयोगाने 12 जुलै 2022 रोजीच्या निर्देशान्वये त्यास तूर्तास स्थगिती दिली आहे.

या संदर्भातील सुधारीत आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश घोषित करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले असल्याचे उप जिल्हाधिकारी, (पुनर्वसन) नितीन गावंडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *