Wednesday, April 24, 2024
Homeनगरगॅस पाईपलाईनमुळे अपघात भरपाईसाठी धरणे आंदोलन

गॅस पाईपलाईनमुळे अपघात भरपाईसाठी धरणे आंदोलन

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नगर-औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या भारत गॅस रिसोर्सेस लि. पाईपलाईन प्रकल्पाच्या कामाच्या कुचराईमुळे झालेले अपघात व त्यामुळे झालेली जीवितहानी यामुळे सदर कंपनीवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना व जखमींना भरपाई द्यावी यासाठी नेवासा काँग्रेसकडून जागतिक बँक कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

याबाबत निवेदनात म्हटले की, मृतांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपये तर जखमींना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच भारत गॅस रिसोर्सेस कंपनीवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली होती. मात्र मदत न झाल्याने काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत जागतीक बँक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे निवेदन कार्यकारी अभियंता एन. एन. राजगुरू यांना दिले.

निवेदनावेळी नेवासा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संभाजी माळवदे, शहर अध्यक्ष रंजन जाधव, सचिन बोर्डे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा पातारे, जिल्हा काँग्रेसचे सुदामराव कदम, सरचिटणीस संदीप मोटे, सतीश तर्‍हाळ, ओमकार चौधरी, ज्योती भोसले, मिरा वडागले, शोभा बोर्गे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या