Thursday, April 25, 2024
Homeनगररस्त्यावर मांडल्या चुली अन् भाजल्या भाकरी

रस्त्यावर मांडल्या चुली अन् भाजल्या भाकरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात आली आहे. अशावेळी केंद्र शासनाने केलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरातील

- Advertisement -

वाढीमुळे गृहीणींचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केले.

घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने सोमवारी सिध्दीबागेसमोरील रस्त्यावर चुल मांडून भाकरी भाजण्याचे आंदोलन करत या दरवाढीचा निषेध केला आहे. यावेळी सुनंदा कांबळे, सुनिता पाचरणे, मनीषा सरोदे, सारिका खताडे, शितल राऊत, शितल गाडे, उषा सोनटक्के, वर्षा कुर्हाडे, गीता कामत, लीला डाडर, ज्योती निकम, अर्चना केदारी आदी उपस्थित होते.

ही दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक दरवाढ असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कुटंबाचे आर्थिक नियोजन बिघडले असून दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे.

करोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या