गॅस सिलेंडरचा भडका; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

सातपूर | प्रतिनिधी Satpur

येथील राधाकृष्णनगर (Radhakrishna Nagar) परिसरातील सरोदे संकुल (Sarode Sankul) येथे गॅस सिलेंडरचा (Gas Cylinder Blast) भडका झाल्याने आईचा भाजल्याने मृत्यू झाला. तर, मुलगी गंभीर जखमी झाली आहे….

अधिक माहिती अशी की, काल (दि २०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अर्चना ललेंद्र सिंह (वय ४०, रा. सरोदे संकुल रु. न ५) या स्वयंपाक करत असतांना अचानक गॅसचा स्फोट (Cylinder Blast) झाला. या आगीत अर्चना या ७५ टक्के भाजल्या गेल्या.

त्यांना उपचारार्थ नाशिक येथील शासकीय रुग्णालयात (Nashik Civial Hospital) दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगी आस्था ललेंद्र सिंह (वय १६) हीदेखील या आगीत भाजली गेली आहे. तिच्यावर अशोकनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अर्चना यांचे पती ललेंद्र सिंह यांनी आगीतून दोघींना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु अर्चना या घाबरल्याने आगीतून बाहेर पडण्यास हिंमत दाखवत नव्हत्या.

त्यामुळे होरपळून त्यांचा मृत्य झाला. घटनास्थळी आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन विभागाने धाव घेत आग विझवली.