Friday, April 26, 2024
Homeनाशिकगॅस सिलिंडर स्फोटातील आणखी दोघांचा मृत्यू

गॅस सिलिंडर स्फोटातील आणखी दोघांचा मृत्यू

जुने नाशिक । प्रतिनिधी

शुक्रवारी रात्री उशीरा वडाळानाका भागातील संजरीनगर मधील राहत्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकूण 8 जण जखमी झाले होते. यातील दोन महिलांचा शनिवारी तर आज दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 4 झाला आहे. तर चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत संपूर्ण कुटूंब उध्वस्त झाल्याने शासनाने त्वरीत मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

सय्यद लियाकत रहीम (32) व सय्यद नुसरद रहीम (25) अशी दोघा मृत भावांची नावे आहेत. लियाकत 27 टक्के, तर नुसरद हा 63 टक्के भाजला होता. घरातील सिलिंडर बदलताना गळती होऊन ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत 95 टक्के जळालेल्या नसरीन नुसरत सय्यद (वय 25) व सईदा शरफोद्दीन सय्यद (वय 49) यांचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. आता शोएब वलिऊल्ला अन्सारी(28) 90 % जळीत, मुस्कान वलिऊल्ला सय्यद (25) 85 % जळीत, आरीफ सलिम अत्तार (53) 09 % जळीत व रमजान वलिऊल्ला अन्सारी (22) 27 % जळीत यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस उपायुक्त अमोल तांबे, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय धमाळ आदींनी पाहणी केली.

मदतीसाठी पुढाकार

घटनेनंतर संजरीनगर व अकबर अली मार्केट परिसरातील युवकांनी एकत्र येत गॅस सिलेंडर स्फोटात जिवितहानी पोहोचलेले सय्यद कुटुंबीय व चिंताजनक परिस्थितीत असलेले अन्सारी कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जखमी रमजान अन्सारी (22) व मुस्कान अन्सारी (25) यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांचा खर्च गोळा करुन तरुण मंडळी करणार आहेत. तर उध्वस्त झालेले कुटुंब व त्यांचे संसार देखील नव्याने पुनर्निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

इस्लामी कायद्यानूसार अन्सारी कुटुंबियांच्या मदतीसाठी ‘जकाती’ ची रक्कम देखील स्वीकारली जाईल मात्र सय्यद कुटुंबियांना ही रक्कम देता येणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी ‘डोनेशन’ ची रक्कम द्यावी, असे आवाहन मुदस्सर सय्यद यांनी केले आहे. खतीबे शहर हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांनी देखील दोन्ही कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच हेलबावडी-दख्नीपुरा मशिदीत देखील मदतीची रक्कम गोळा करण्यात येत असल्याची माहिती हाजी जाकीर अन्सारी यांनी दिली आहे.

नणंद-भावजयीनंतर सख्ख्या भावांचा मृत्यू

शनिवारी स्फोटातील गंभीर जखमी सईदा सय्यद (49) व नसरीन सय्यद (31) या सख्ख्या ननंद-भावजयी मृत्यू झाले होते, तर आज दुपारी नुसरत सय्यद (25) व लियाकत सय्यद (32) या सख्खे भावांचे देखील उपचारा वेळी निधन झाले. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे सय्यद कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या