Friday, April 26, 2024
Homeनाशिकघंटागाडीचालक बनले स्वच्छतादूत

घंटागाडीचालक बनले स्वच्छतादूत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad Industrial Estate) कचऱ्याचे आगार बनलेल्या ब्लॅकस्पॉटचे (Blackspot) ग्रीन स्पॉटमध्ये (Green spot) रूपांतरित करण्याचा विडा घंटागाडी कर्मचारी (Ghantagadi staff) आणि वॉटरग्रेसचे व्यवस्थापक विजय जमदाडे (Watergrace Manager Vijay Jamdade) यांनी उचलून तो संकल्प सिद्धीस नेल्याबद्दल या सर्वांचे उद्योजकांबरोबरच सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

- Advertisement -

घंटागाडीवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी १० झाडे दत्तक घेतले. यावेळी वेअर हाऊससमोरील ब्लॅकस्पॉटची (Blackspot) साफसफाई करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. .त्या नंतर दत्तक घेतलेली झाडे तेथे लावली आणि ती मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आम्ही कचरा (garbage) उचलण्याचे कार्य करीत असलो तरी आम्हालासुद्धा सर्व परिसर स्वच्छ, सुंदर आणि हरित असावा असे वाटते आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आयमाने घंटागाडी (ghantagadi) कर्मचाऱ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. स्वच्छते बद्द्ल कळकळ असलेल्या आणि इतरांपुढे आदर्श घालून देणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना खरोखरच सलाम. त्यांचा हा आदर्श इतरांनी घेतल्यास स्वच्छतेच्याबाबतीत नाशिक निश्चितच अव्वल स्थान पटकावेल असा विश्वास आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या