Wednesday, April 24, 2024
Homeनगरसावेडीतील कचरा डेपोला आग

सावेडीतील कचरा डेपोला आग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी कचरा डेपोला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. सदर डेपो गेल्या वर्षभरापासून बंद आहे.

- Advertisement -

यामुळे डेपोत साचलेला कचरा वाळलेला असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. महापालिका अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी रात्री 1 वाजेपर्यंत प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले होते.

मनपाच्या सावेडी कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी देखील या डेपोला आग लागली होती. त्यावेळी शहराचा संपूर्ण कचरा या डेपोत प्रक्रियेसाठी नेला जात होता. मात्र या आगीच्या घटनेनंतर तेथे कचरा टाकणे बंद असून आता बुरूडगावच्या कचरा डेपोत कचरा पाठविला जातो.

सावेडी कचरा डेपो बंद असला तरी यापूर्वीच्या कचरा डेपोचे तेथे ढिग आहेत. या कचर्‍याच्या ढीगाला मंगळवारी रात्री आग लागली. मनपाला याची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक वाहने डेपोकडे रवानाकरून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या