Friday, April 26, 2024
Homeनगरकचरा संकलनाचा बोजवारा

कचरा संकलनाचा बोजवारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छता सर्वेक्षण (Hygiene Survey) अंतर्गत विविध उपाययोजना केल्याचा डंगोरा महापालिकेकडून (Municipal Corporation) पिटला जात आहे. मात्र, सावेडी (Savedi) उपनगर परिसरातील काही भागात कचरा संकलनासह (Garbage collection) रस्त्यांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. दोन ते तीन दिवसातून एकदाच कचरा गाडी (Garbage Truck) येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

- Advertisement -

महापालिकेने (Municipal Corporation) खासगी तत्वावर कचरा संकलनाचे काम दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात सर्वत्र कचरा संकलन (Garbage collection) नियमितपणे सुरू आहे. मात्र, काही महिन्यांपासून सावेडी उपनगर (Savedi) परिसरात कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. अनेक भागात दिवसाआड कचरा गाडी येत आहे. तर काही भागात दोन-तीन दिवसांतून एकदाच कचर्‍याची गाडी येते. त्यामुळे दररोज साचणारा ओला कचरा टाकायचा कुठे, असा सवाल नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. कचरा गाडी न आल्यास अनेक नागरिक ओला कचरा रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते.

दरम्यान, उपनगरातील अनेक वसाहतींमध्ये दैनंदिन रस्त्यांची सफाईही नियमित होत नसल्याचे समोर आले आहे. पाच ते सात दिवसातून एकदा, तर काही भागात आठ ते 10 दिवसातून एकदा रस्त्यांची झाडलोट केली जाते. रस्त्यांची साफसफाई दररोज होत नसल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या