Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिककरांनो सावधान : गंजमाळ ते त्र्यंबक नाका परिसरातील वाहतूकीत बदल

नाशिककरांनो सावधान : गंजमाळ ते त्र्यंबक नाका परिसरातील वाहतूकीत बदल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उद्यापासून नाशिक शहरातील त्र्यंबक नाका सिग्नल ते गंजमाळ सिग्नल पर्यंतच्या रस्त्यावर 67 दिवसांसाठी एकेरी वाहतूक करण्यात येणार असल्याचा अध्यादेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काढला….

- Advertisement -

स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत त्र्यंबक नाका सिग्नल ते गंजमाळ सिग्नलपर्यंत पिण्याच्या पाईपलाईनचे काम उद्या ( दि. 20 ) पासून सुरू होणार असून 27 मार्च पर्यंत 67 दिवस हा रस्ता एकेरी वाहतूकिसाठी सुरू राहणार आहे.

या वाहतूक मार्गामध्ये गंजमाळ सिग्नल कडून त्र्यंबक नाका सिग्नलकडे सुरू असलेली वाहतूक तशाच प्रकारे सुरू राहील तर त्रंबक नाका सिग्नल कडून गंजमाळ सिग्नलकडे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे.

या वाहतुकीचे सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक दलाची, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना देखील लागू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त यांनी जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या