धरणांची स्थिती…येरे येरे पावसा!

jalgaon-digital
3 Min Read

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोटात (Gangapur, Darna Watershed) गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. कालही पावसाळी वातावरण होते. परंतु पावसाचे आगमन झालेच नाही. मात्र गोदावरी कालव्यांच्या 9Godavari kalwa) लाभक्षेत्रात काल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेनंतर काही ठिकाणी जोरदार (Heavy Rain) तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन झाले. दारणा धरण (Darna Dam) 45.57 टक्क्यांवर स्थिर आहे. तर गंगापूर धरण साठा (Gangapur Dam storage) पिण्याच्या पाण्याच्या वापरामुळे घटत आहे.

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे हालके ते मध्यम स्वरुपाचे आगमन होत आहे. काल कोपरगाव तालुक्यातील (Kopargav) बुरबूर स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र राहाता (Rahata) तालुक्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात मुसळधार पावसाची शेतकरी वाट पाहत आहे. गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पडत असल्याने शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासांत शिर्डी (Shirdi) येथे 15 मिमी पावसाची नोंद झाली. कोपरगावला 1 मिमी, राहाता 3 मिमी, रांजणगाव 3 मिमी, चितळी 5 मिमी असा पाऊस नोंदला गेला. काल सायंकाळी 5 नंतर मात्र बर्‍यापैकी पावसाचे आगमन राहाता तालुक्यातील बहुतांशी गावात होत होते.

लाभक्षेत्रात पावसाने सुखद धक्का दिला असला तरी धरणांच्या पाणलोटात मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) घाटमाथ्यावर पावसाचा काल मागमूसही नव्हता. मात्र काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 24 मिमी, घोटी येथे 4 मिमी, भावलीला 7 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. दारणा धरणात काल सकाळी 6 वाजता 45.57 टक्के पाणीसाठा होता. भावली धरण 43.89 टक्क्यांवर स्थिर आहे. तर गंगापूर धरणाचा साठा कमी कमी होत तो 34.51 टक्क्यांवर काल स्थिर होता. गंगापूरच्या पाणलोटातील अंबोलीला 21 मिमी, त्र्यंबकला 7 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याला मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये काल 23.05 टक्के उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला तो 28.41 टक्के होता. एक-दोन दिवसांत आठवडाभर धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जायकवाडीत उपयुक्तसाठा 25 टीएमसी!

दरम्यान जायकवाडी धरणात कालच्या आकडेवारीनुसार उपयुक्तसाठा 25.1 टीएमसी इतका आहे. तर मृतसह एकूणसाठा 51.2 टीएमसी इतका आहे. या धरणात उपयुक्तसाठा 32.83 टक्के इतका आहे. अजून नविन पाणी या धरणात आलेले नाही.

आजपासून 17 जुलै पर्यंत नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आठवडाभर चांगला पाऊस राहील. कोकणपट्टी, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असा पावसाचा मार्ग असेल. या पावसाने पेरण्या होतील. तर झालेल्या पेरण्यांना जीवदान मिळेल. पुर्व विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, आरबी समुद्रातील ढग विदर्भाच्या दिशेने ओढले जात आहेत. त्यामळे त्याचा लाभ पश्चिम महाराष्ट्राला होईल. तसेच गुजरात भागातही कमी दाबाचा पट्टा निमर्ण झाल्याने काही काळासाठी पाऊस मंदावेल पण त्याचा फायदा जमिनीत वाफसा निर्माण होऊन खरीप पेरण्यांना वेग होईल. पुढील कालखंडात दोन टप्प्यात चांगला पाऊस होईल. त्यामुळे धरणात पुरेसा साठा निर्माण होईल.

– उत्तमराव निर्मळ, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *