Friday, April 26, 2024
Homeनाशिकगंगापूर धरण 99 टक्के

गंगापूर धरण 99 टक्के

नाशिक । NASHIK (प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील गेल्या दोन आठवड्यापासुन पाऊस एकदम कमी झाला असुन धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. दरवर्षीच्या तुलनेत सप्टेंबरच्या दहा दिवसात अल्प पाऊस झाला आहे.

- Advertisement -

शहराला पाणीपुरवठा करणारे धरण; आजची स्थिती

धरण उपयुक्त साठा आजचा साठा टक्केवारी

गंगापूर 5630 5565 (द.ल.घ.फु.) 98.85

कश्यपी 1852 1330 71.81

गौतमी 1868 1591 85.17

एकुण 935े0 8286 85.27

परिणामी गंगापूर समुह धरणे अद्यापही पुर्ण भरलेली नाही. गंगापूर समुह धरणातील जलसाठा 85.27 टक्के इतका झाला आहे. तर गंगापूर धरणातील साठा 99 टक्क्यापर्यत गेला असुन धरण भरले आहे.

आज (दि.13) गंगापूर धरण समुहात सकाळी 6 वाजेपपर्यत एकुण 85.27 टक्के (8286 दश लक्ष घन फुट) इतका जलसाठा नोंदविला गेला आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातच समुह साठा शंभर टक्के इतका झाला होता.

यंदा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या ऑगस्ट महिन्यात पुरेशा पाऊस झालेला नाही. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यात आणि नाशिक तालुक्यातील गंगापूर व कश्यपी धरणाच्या परिसरात देखील अपेक्षित पाऊस पडत नसल्याने समुह साठा केवळ 85 टक्क्यापर्यत गेला आहे.

अजुन समुह साठा पुर्ण भरण्यासाठी चांगल्या पाऊसाची गरज आहे. गंगापूर धरणातील जलसाठा 98.85 टक्के इतका जलसाठा झाला आहे. तसेच कश्यपी व गौतमी धरणातील साठा अनुक्रमे 72 व 85 टक्के झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या