Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागंगाधरन डी नाशिकचे नवे जिल्हाधिकारी; सुरज मांढरे यांची बदली

गंगाधरन डी नाशिकचे नवे जिल्हाधिकारी; सुरज मांढरे यांची बदली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गंगाधरन डी (Gangadharan D) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

आज प्राप्त झालेल्या आदेशानुसार डॉ. संजय चहांदे, ए एम लिमये, एसए तागडे, श्रीमती आभा शुक्ला, डॉ अमित सैनी, आरएस जगताप, विवेक भीमानवार, राहुल द्विवेदी आणि गंगाधरन देवराजन या नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये गंगाधरन देवराजन यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये गंगाधरन वसई विरार महापालिकेचे आयुक्त असताना त्यांची नाशिकला बदली झाल्याची जोरदार चर्चा मुंबईसह परिसरात होती.

त्यानंतर त्यांची मुख्य सचिव कार्यलयात उपसचिव पदी बदली करण्यात आली होती. गंगाधरन देवराजन हे २०१३ सालचे आयएएस अधिकारी आहेत. सुरज मांढरे यांची कुठे बदली झाली आहे. याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र,करोना काळात उत्तम कार्य केल्याचा गौरव नाशिककर केल्यावाचून राहणार नाहीत.

मांढरे यांच्या बदलीच्या वृत्ताने संपूर्ण नाशकात हा चर्चेचा विषय झाला आहे. गंगाधरन देवराजन कोण आहेत? कुठून आले आहेत? याबाबतची माहिती मिळविण्यासाठी धडपड रात्री उशिरा नाशिककरांची सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या