Thursday, April 25, 2024
Homeधुळेगायींची चोरी करणारी टोळी गजाआड

गायींची चोरी करणारी टोळी गजाआड

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील देवपूर परिसरातील प्रभात नगरात कारमधुन गायीची चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.

- Advertisement -

त्यांच्याकडून कार व एक गाय असा एकुण 1 लाख 10 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला असून तिघांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.

देवपूरातील प्रभात नगर, विटाभट्टी परिसरात काल दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी कारमध्ये गाय टाकून ती चोरुन घेऊन जात होते.

हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्याने चोरटे गाय तेथेच सोडून पसार झाले. याप्रकरणी काशीनाथ तुळशीराम लोणारी यांच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गुन्हयाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा समांतर तपास करत असताना माहिती प्राप्त झाली की, हा गुन्हा हा शब्बीर शहा, समीर शेख व सलमान खान सर्व (रा. धुळे) यांनी केला असून गुन्ह्यामध्ये वापरलेली कार ही वसीम अन्सारी (रा. मच्छीबाजार, धुळे) याची असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.

प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पथकाने संशीयतांचा शोध घेता ते कबीरगंज येथील शब्बीर शहा याचे घरी लपून बसल्याची महिती मिळाली.

आज दुपारी शब्बीर शहा याचे घरावर छापा टाकला असता त्याचे घरी शब्बीर शहा सुलेमान शहा, (वय26 रा. पत्र्यावाली मस्जीदजवळ, कबीरगंज, धुळे), वसीम रफीक अन्सारी (वय32 रा. मच्छीबाजार, ग.नं.7, पोलीस स्टेशनमागे, धुळे), समीर रहीम शेख वय 26 रा. आझादनगर, स्लाटरहाउसचे मागे, धुळे) व सलमानखान अख्तरखान (वय 19 रा. बाराफत्तर, ग.नं. 1, धुळे) हे मिळून आले. ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार (क्र. एम.एच. 01 बी.टी. 6212) व एक तपकिरी काळ्या रंगाची गाय असा एकूण 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांनी जप्त केलेली गाय ही त्यांनी देवपूर मरीमाता मंदिराजवळील भिलाटी येथून चोरल्याची कबूली दिली आहे.

संशयीतांनी यापूर्वी सोनगीर पोलिस ठाणे हद्दीत गुन्हा केल्याचेही कबूल केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोहेकॉ. रफीक पठाण, श्रीकांत पाटील, पोना. प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, पोकॉ. राहुल सानप व संजय सुरसे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या