Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! अल्पवयीन मुलीवर शाळेत सामूहिक अत्याचार

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर शाळेत सामूहिक अत्याचार

मुंबई | Mumbai

मुंबईत एका 13 वर्षीय मुलीवर शाळेमध्ये सामूहिक बलात्कार Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. माटुंग्यातील एका शाळेत ही खळबळजनक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी वर्गातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाला आहे. या शाळेत वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या हॉलमध्ये येण्यास सांगितले. याच दरम्यान इयत्ता आठवीच्या एका मुलीला वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी अडवले आणि तिच्यावर बलात्कार केला.

यावेळी त्यांचे 2 साथीदार वर्गाबाहेर पहारा देत होते, अशीदेखील माहिती समोर येत आहे. पीडित मुलीने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर तिच्या आईला याबाबत माहिती मिळाली.

यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानुसार दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांना डोंगरी सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या