Friday, April 26, 2024
Homeनगरदरोड्याच्या तयारीतील टोळी केडगावात गजाआड

दरोड्याच्या तयारीतील टोळी केडगावात गजाआड

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील केडगाव उपनगरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. टोळीतील चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

सोनू उर्फ रूपेश सुधाकर भालेराव (वय 21), रोहन सतिष शिंदे (वय 21), कुणाल सुधाकर भालेराव (वय 19, तीघे रा. पंचशीलनगर, रेल्वेस्टेशन रोड, नगर) आणि अनुज सुधाकर उजागरे (वय 22 रा. ताराबाग कॉलनी, केडगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई मोरे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही युवक दरोड्याच्या तयारीने थांबले असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना समजली होती. उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत भंगाळे, सहायक निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. आरोपींकडून दोन दुचाक्या, लोखंडी धारदार सत्तुर, लोखंडी गज आणि मिरची पुड असा 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या