Monday, April 29, 2024
Homeजळगावदरोडेखारांची टोळी आयजींच्या पथकाकडून जेरबंद

दरोडेखारांची टोळी आयजींच्या पथकाकडून जेरबंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

परजिल्ह्यातील पाच जणांनी टोळी (gang of five) गावठी पिस्तुल, काडतूस व वस्तारा घेवून दरोडा (Robbery) घालण्यासाठी आली होती. दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या या टोळीला दरोडा घालण्यापुर्वीच तेल्या घटातील जंगलातून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने (Special Inspector General of Police Squad) जेरबंद केले. टोळीतील तिघांना पालिसांनी अटक (Arrested) केली असून दोघे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाच जणांची (gang of five) टोळी शस्त्रास्त्र घेवून दरोडा (Robbery) टाकण्यासाठी आली असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहम हे आपल्या पथकासह टोळीच्या हालचालींवर नजर ठेवून होते. ही टोळी चोपडा तालुक्यात असल्याची माहिती मिळताच रोहम हे पथकासह त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी चोपडा पोलीस ठाण्याचे पोनि देविदास कुनगर यांना देखील या पथकाने सोबत घेतले होते. ही टोळी तेल्या घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच या पथकाने या घाटात गुप्त सापळा (Secret trap) लावला होता.

जंगलातून पळून जातांना आवळल्या मुसक्या

पोलिसांचे वाहन (Police vehicles) पाठलाग करीत असल्याने काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या झरा असलेल्या ठिकाणी दरोडेखोरांनी आपले वाहन थांबविले आणि ते जंगलाच्या दिशेने पळत सुटले. पथकाने देखील त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. गणेश बाबासाहेब केदार (वय-24, रा.पाडळी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर), कालिदास दत्तात्रय टकले (वय- 28, रा.हरताळा, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर) व विकास आप्पासाहेब गिरी (वय-22, रा.पाडळी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर) या तिघांना पथकाने अटक (Arrested) केली.

तर उर्वरीत दोघ पळून जाण्यात यशस्वी झाले. पळून गेलेले दोघ दरोडेखोर हे मध्यप्रदेशातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तीन गावठी पिस्तुलांसह 14 काडतूस, वस्तारा हस्तगत पकडलेल्या दरोडेखोरांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ तीन गावठी पिस्तूल, 14 काडतूस, 1 वस्तरा मिळून आला. तसेच या दरोडेखोरांनी आणलेली चारचाकीसह 6 लाख 34 हजार 100 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या