Tuesday, April 23, 2024
HomeUncategorized...त्याने पुन्हा छापल्या बनावट नोटा!

…त्याने पुन्हा छापल्या बनावट नोटा!

औरंगाबाद – aurangabad

दोन वर्षांपूर्वी बनावट नोटा छापून विक्री केल्याप्रकरणी पुंडलिकनगर (police) पोलिसांनी समरान ऊर्फ लकी रशीद शेख (३०, रा. जसवंतपुरा, नेहरूनगर) याला अटक केली होती. मात्र नंतर (corona) कोरोना काळात डिसेंबर २०२० मध्ये त्याला जामीन मिळाला. कारागृहातून बाहेर येताच त्याने पुन्हा हाच धंदा सुरू केला.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी परिसरात भाड्याने जागा घेऊन त्याने नोटांचा कारखाना सुरू केला. यावेळी जुन्या सहकाऱ्यांना बाजूला ठेवून नवीन टोळी तयार केली. परंतु, २ वर्षांनी पुन्हा समरानसह इतर चार जण पुंडलिक नगर पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी समरानसह नितीन कल्याण चौधरी (२५), अक्षय अण्णासाहेब पडूळ (२८), दादाराव पोपटराव गावंडे (४२) आणि रघुनाथ चैनदास ढवळपुरे (४९, तिघेही रा. गजानननगर) यांना अटक केली.

दोन दिवसांपूर्वी पुंडलिकनगर परिसरातील सुपर वाइन शॉपमध्ये एका मजुराने बनावट नोट देऊन दारू खरेदी केली. संध्याकाळी गर्दीची वेळ असल्याने दुकानचालकाच्या ते लक्षात आले नाही. नंतर कळल्यावर त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली. पण खरेदी करणारा नेहमीचा ग्राहक असल्याने पुन्हा येण्याची खात्री होती. त्यानुसार सहायक निरीक्षक एस. के. खटाने यांनी सापळा लावला.

संध्याकाळी सात वाजता मिस्त्री असलेला रघुनाथ ढवळपुरे तेथे दारू घेण्यासाठी आला. त्याने पुन्हा बनावट नोट दुकानदाराला दिली. तेवढ्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी सर्वप्रथम गावंडेला ताब्यात घेतले. नंतर क्रमाने अक्षय, नितीन व शेवटी मुख्य सूत्रधार समरानला अटक करण्यात आली. खोलीतून पोलिसांनी प्रिंटर, कटर व इतर साहित्य जप्त केले.

भोपाळला शिकला प्रिंटिंग

बीएस्सी संगणकशास्त्रात पदव्युत्तर असलेला समरान काही वर्षांपूर्वी भोपाळला सॉफ्टवेअरचे क्लासेस करण्यासाठी गेला होता. तो नाशिक, बदनापूर, मालेगाव, जालना, पुण्याला बनावट नोटांचा पुरवठा करायचा. २०१९ मध्ये अटक झाली होती तेव्हा त्याची एटीएस व गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी झाली.

भोपाळला क्लासेस करत असताना त्याने बनावट नोटा तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकल्याचे त्या वेळी समोर आले होते. समरान एका मिनिटात हुबेहूब नोट छापतो. भोपाळला असताना २१ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याने तिला शहरात आणले होते. गेल्या वेळी समरानला अटक होताच तिने ठाण्यात जाऊन धिंगाणा घातला होता. पुण्याच्या मित्रांपर्यंत समरान नोटा पुरवत होता. यापूर्वी पोलिसांनी मित्राला अटक केली होती. मात्र, तोदेखील नोव्हेंबर, २०२० मध्ये जामीनावर सुटला व त्याच्या महिनाभरानंतरच समरान जामिनावर बाहेर आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या