Thursday, April 25, 2024
Homeनगरगणेशवाडीत अंगणवाडीच्या बालकांना मिळतोय निकृष्ट आहार

गणेशवाडीत अंगणवाडीच्या बालकांना मिळतोय निकृष्ट आहार

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) गणेशवाडी (Ganeshwadi) येथे अंगणवाड्यांना (Anganwadi) मिळणारा पोषण आहार (Nutrition Diet) अतिशय निकृष्ट दर्जाचा (Inferior Quality) मिळतो. या मध्ये मिळणारे मूग दाळ (Moong), गहू (Wheat), मिरची पावडर (Chili powder), मिठ (Salt), हरभरा (Gram) अशा प्रकारे शासनाच्या नियमानुसार सुका शालेय पोषण आहार (Nutrition diet) सर्वच अंगणवाड्यांना देण्यात येतो. पुणे जिल्ह्यातील (Pune District) एका कंपनीला याचा ठेका दिलेला आहे. माल आल्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारे कुठेही त्याची तपासणी केली जात नसल्याने ठेकेदार व संबंधित अधिकारी यांचे फावते.

- Advertisement -

मूगदाळीमध्ये माती, खडे,कीड लागलेली दाळ, मिठामध्येही माती मिश्रीत खडे, हरभरा कीड लागलेला, मिरची पावडरमध्ये देखील मातीचे कण, गहू तर रेशनवर मिळणार्‍या गव्हापेक्षाही खालच्या दर्जाचा. अशा प्रकारे आहार पुरविण्यात येतो. त्याची अद्याप एकाही अधिकार्‍याने दखल घेतलेली नाही हे विशेष.

तीन वर्षांच्या आतील मुलांना मूग दाळ, हरभरा, साखर, मिठ, मिरची पावडर असे आहार साहित्य आहे. त्यामध्ये गहू तीन वर्षाच्या मुलांना कसा खाऊ घालायचा? असा प्रश्न पालक करतात. ‘मुलं ही देवा घरची फुलं’ असे म्हटले जाते. परंतु या मध्यमातून एक प्रकारे त्याच्या जिवाशी हे अधिकारी कशा प्रकारे खेळ खेळतात त्याचे हे एक जिवंत उदाहरण. अंगणवाड्यांना माल वितरित करण्यापूर्वी त्या मालाची प्रत्येक तालुकास्तरावर त्याची तपासणी करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत असल्याचे या सर्व गोष्टींवरून दिसून येत आहे.

दोषी ठेकेदार (Guilty contractor) व अधिकारी यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व यापुढे मिळणारा आहार हा उत्तम दर्जाचा मिळावा, अशी मागणी (Demand) ग्रामस्थांनी केली आहे.

यापुढे मालाची तपासणी करुनच तो माल अंगणवाड्यांना वितरित करण्यात येईल .

-सोपान ढाकणे, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या