Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यालाडक्या गणरायाचे धुमधडाक्यात आगमन

लाडक्या गणरायाचे धुमधडाक्यात आगमन

नाशिक । प्रतिनिधी

विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाची उत्कंठा लागुन असलेल्या कोट्यावधी गणेशभक्तांची प्रतिक्षा आज संपली. करोनाचे सावट असतांनाही गणेशोत्सवाची तयारी पुर्ण करत नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत नाशिककरांनी मोठी गर्दी सजावटीचे सामान आणि लाडक्या गणरायाची मूर्ती घेण्यासाठी केली होती….

- Advertisement -

पंचागाप्रमाणे शुभ मुहूर्तावर लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना आज केली जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला करोना साथीचे सावट असल्याने आणि या महाउत्सवाच्या गर्दीतून करोना संक्रमण वाढले जाऊ नये म्हणुन राज्य शासनाने मोठी आचारसंहिता घालून दिली आहे.

असे असतांना गणेशभक्तांचा उत्साह कमी झालेला नसुन करोनाचे विघ्नहर्ता म्हणुन त्यांच्या आगमनाची तयारी मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाली आहे. रस्त्यावरील सार्वजनिक मंडळाची संख्या कमी होत असली तरी ही कसर घरातील आरास करुन काढली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आज आरास, सजावट, पुजा साहित्य, श्री मुर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.

लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या उत्कंठेतून गणेशभक्तांना करोनाचा विसर पडल्याचे दिसुन आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या