Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedGaneshotsav 2020 : नेत्यांनी केले बाप्पाचे स्वागत !

Ganeshotsav 2020 : नेत्यांनी केले बाप्पाचे स्वागत !

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील निवासस्थानी विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

- Advertisement -

तर प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे आणि सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी निवासस्थानी विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

मंत्री धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात श्रींची विधिवत स्थापना केली.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आपल्या घरी श्रींची विधिवत स्थापना केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या