Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे 'या' दिवशी बंद! केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार

पुणे ‘या’ दिवशी बंद! केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार

पुणे (प्रतिनिधी)

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणजेच गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) दिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद (Pune shops will closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीच्या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू ठेवण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी ही माहिती दिली आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार आणि पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात गणपती विसर्जना दिवशी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश विसर्जनाला पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दुकाने बंद करुन निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या