Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात माघी गणेश जयंती उत्साहात

नाशकात माघी गणेश जयंती उत्साहात

नाशिक । Nashik

शहरातील गणेश मंदिरांमध्ये आज माघी गणेश जयंती सोहळा धार्मिक वातावरणात आणि मंगलमय विधींनी साजरा करण्यात आला.

- Advertisement -

सकाळपासूनच गणेश दर्शनासाठी भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली. शहरातील नवश्या गणपती, चांदीचा गणपती, ढोल्या गणपती, सिद्धिविनायक गणपती, इच्छापूर्ती गणेश मंदिर, इच्छामणी गणपती, मोदकेश्वर गणपती या मंदिरांमध्ये गणेश जयंतीनिमित्त रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांनी गणेश मंदिर परिसर फुलून गेला.

भाविकांच्यादृष्टीने महत्त्वाचा धार्मिक सोहळा म्हणून माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त गणेश मंदिर व्यवस्थापनानेही सोमवारी उत्सवाची तयारी केली होती. ​रात्री शब्दसुरांच्या झुल्यावर या भावगीत मैफलीने उत्सवाची सांगता झाली.

नवश्या गणपती मंदिर येथे सकाळी अभिषेक करण्यात आला.चांदीचा गणपती मंदिरात दिवसभर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध गणपती मंदिरात गणेशमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यानिमित्त मंदिराची सजावट करण्यात आली होती. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून गणेशमूर्तींची आकर्षक पूजा हे आजच्या गणेश जयंतीचे वै​शिष्ट्य ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या