अहमदनगर शहरात गणेश विसर्जन उत्साहात

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा करोनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली नाही. नगर शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपतीसह मानाच्या

अकरा गणपती व घरगुती गणपतीचे विसर्जन ‘विसर्जन रथ आपल्या दारी’ या उपक्रमातून झाले. शहर पोलीस व महापालिका यांनी यासाठी पुढाकार घेतला.

करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता सरकारने धार्मिक उत्सावर बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा गणेशोत्सव साध्य पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. मानाच्या गणेश मंडळासह सार्वजनिक गणेश मंडळाने याला चांगला प्रतिसाद दिला.

सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते मानाच्या विशाल गणपतीची उत्थापन पुजा पार पडली. यानंतर शहर पोलीस व महापालिका यांनी मानाच्या अकरा गणपतीचे विसर्जन व घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी ‘विसर्जन रथ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी विशाल गणपती, संगम मित्र मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्र मंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्वर मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, समझोता तरुण मंडळ, नीलकमल मित्र मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळ, तसेच घरातील गणेश विसर्जनासाठी ‘विसर्जन रथ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला. दिवसभर शांततेत व भक्तिमय वातावरणात विसर्जन पार पडले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *