गणेशमूर्तीकारांवर यंदा संकट

jalgaon-digital
2 Min Read

अस्तगाव | वार्ताहर | Astagaon

करोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवास अडचण असल्याने अस्तगावच्या Astagaon गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठीच्या ग्राहकांच्या गर्दीला यंदा ब्रेक बसला आहे. केवळ छोट्या घरगुती गणपतीला मागणी राहाणार असल्याने मोठ्या आकाराचे गणेशमूर्ती ग्राहकांविना तशाच पडून राहाणार असल्याने अस्तगाव येथील गणेशमुर्तीकारांचे मोठे नुकसान होणार आहे.

गणेशमूर्ती तयार करण्यात कोकणातील पेन नंतर नगर शहर आहे, त्यानंतर अस्तगावचा क्रमांक लागतो. येथील 10 ते 12 कुटूंब गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर करत असतात. येथील गणेशमूर्ती रेखीव आखीव असल्याने व सुंदर रंगकाम त्यावर केले जात असल्याने येथील गणेशमूर्ती खरेदीसाठी जिल्ह्यातील अनेक ग्राहक अस्तगावला येत असतात. या गणेशमूर्ती राज्यात तसेच परराज्यातही मागणी असते.

परंतु यंदा करोना संकटामुळे तीन ते चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्ती बसविण्यास सरकारने बंदी आणली आहे. 8 ते 9 फुटांच्या गणपतीच्या मुर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बसवत असतात. परंतु त्यांना यंदा हे गणपती बसविता येणार नाहीत. अस्तगावला हे मोठ्या आकाराच्या गणेश मुर्ती बनविण्याचे काम दरवर्षी जानेवरीतच सुरु होते. येथील कारागिरांनी ते सुरु केले होते. मुर्ती बनविल्या परंतु करोनाच्या संकटामुळे त्या मुर्ती न रंगविता तशाच प्लॅस्टिक कागदात बांधुन ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे एका एका मुर्तीकाराचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यातच न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुर्तींवर बंदी आणली आहे. तुर्तास यावर्षी या पीओपीच्या मुर्ती चालतील पण पुढील वर्षी त्यांना बंदी येणार आहे. त्यामुळे मुर्तीकारांनी पुढील वर्षीसाठी ठेवलेल्या गणपती मुर्तींचे काय होणार? हा मोठा प्रश्‍न आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *