Thursday, April 25, 2024
Homeनगरगणेशने दिपावली निमित्त पेमेंट करावे

गणेशने दिपावली निमित्त पेमेंट करावे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गणेश सहकारी साखर कारखान्याने दिपावली सणानिमित्त ऊस उत्पादक सभासद शेतकर्यांना तातडीने उसाचे पेमेंट करावे अशी मागणी शेतकरी नेते बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे.

- Advertisement -

मागील गळित हंगामात कारखान्याने प्रतिटन 2219 पेमेंट केले त्यानंतर पेमेंट केले नाही. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी प्रतिटन 2500 रुपयापर्यंत पेमेंट केलेले आहे. गणेश सुरु राहावा म्हणून सभासदांनी इतर कारखान्याला ऊस न देता गणेश सहकारी साखर कारखान्याला दिला. दिपावलीनिमित्त कारखाना पेमेंट करील म्हणून आशा बाळगून आहे. मात्र अघापही पेमेंट बाबत कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे परिसरातील सभासदामध्ये खूपच नाराजी निर्माण झाली आहे.

या प्रश्राबाबत कारखान्याचे पदाधिकारी तसेच संचालक काहीही बोलण्यास तयार नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पेमेंट करावे म्हणून म्हणून पुणतांबा परिसरातील शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ दोन दिवसात कारखान्याच्या पदाधिकार्‍यांना भेटून साकडे घालणार आहेत, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या