Thursday, April 25, 2024
Homeशब्दगंधगणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

-अलका दराडे

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

- Advertisement -

गणेशोत्सवात लहान-थोर सर्वच सहभाग घेतात. हा आनंदोत्सव साजरा करताना एकात्मतेची भावना आपोआपच निर्माण होते. हा नुसता उत्सव नाही तर यात देशप्रेम आहे. 1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला तो एकीच्या भावनेतून. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे तो आपोआपच जात आहे. आज तर अनेक घरांत मुले-मुली आपल्या हाताने गणपती बाप्पा साकारत आहेत व त्याच बाप्पांची घरात मोठ्या आनंदाने स्थापनाही होत आहे. अनेक ठिकाणी गणपती विसर्जन घरीच करत आहेत व ते पवित्र पाणी आपल्या झाडांसाठी वापरले जाते.

सरारात्मकतेने साजरा होणारा हा उत्सव अनेक गोष्टींचे महत्त्व सांगून जातो. आपल्या मुलांना आरतीबरोबर अथर्वशीर्षही शिकवा. त्याच्या पाठांतराने स्मरणशक्ती जागृत व तल्लखही होते. यातूनच मुलांना अभ्यासासाठी प्रेरणा मिळते. गणेशोत्सवातील अनेक कार्यक्रमांमधून मुलांमधील कलागुणांचा विकास होतो. हे गुण एक छंद म्हणून किंवा पुढे व्यवसाय म्हणूनही सत्कारणी लागतात. मुले मोठे झाल्यावर कोणत्याही क्षेत्रात गेले तरी मनाच्या गाभार्‍यातील हे मंगलमूर्तीचे स्थान अढळ म्हणजेच कायमस्वरुपी असते. डीजे, ढोल मोठ्या उत्साहाने वाजवले जातात पण आपण मुलांना सांगितले पाहिजे की, काही आजारी व्यक्ती असतात, विद्यार्थी असतात, लहान बाळं असतात. त्यांना या गोष्टींचा त्रास होतो त्यामुळे हे पर्यावरण प्रदूषण मात्र आपण कमी करायला हवे ना? उत्साहाच्या भरात या गोष्टी मुलांच्या लक्षात येत नाहीत. त्या आपण त्यांना समजावून सांगायला हव्यात.

क्रमश:

- Advertisment -

ताज्या बातम्या