Friday, April 26, 2024
Homeनगरगंगापूरमधून 1040 क्युसेकने विसर्ग

गंगापूरमधून 1040 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गंगापूर धरण 94 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर त्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे. सुरुवातीला 520 नंतर

- Advertisement -

तो 1040 क्युसेकने विसर्ग सोडण्यात सुरुवात झाली. दारणाच्या पाणलोटात पाऊस काल काहिसा मंदावला होता.

मात्र काल सकाळी 6 पर्यंत सपलेल्या मागील 24 तासांत दारणात 907 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 92.54 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन या धरणातून 10486 क्युसेकने विसर्ग सुरुच आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीतील विसर्ग 12620 क्युसेक इतका कायम आहे.

गंगापूरचे पाणी दाखल झाल्यानंतर गोदावरीतील विसर्ग 13 हजार ते 13500 क्युसेक इतका रात्रीतून वाढू शकतो. जायकवाडी धरण काल सायंकाळी 78 टक्क्यांवर पोहचले ! .

गंगापूर धरणात काल दुपारी 1 वाजता 94 टक्के पाणी साठा झाला. सुरुवातीला 520 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर 2 तासांनी दुपारी 3 वाजता तो वाढवून 1040 क्युसेक इतका करण्यात आला. यासाठी गंगापूरचे 9 पैकी 2 दरवाजे एक फुटांनी उचलण्यात आले आहेत. अशी माहिती या धरणाचे उपअभियंता एस. के. मिसाळ यांनी सांगितले.

हा विसर्ग 1500 क्युसेक पर्यंत जावु शकतो. मात्र काल दिवसभर पावसाचा जोर मंदावल्याने विसर्ग 1500 पर्यंत पोहचेल की नाही याबद्दल साशंकता आहे. धरण अद्याप 6 टक्के भरणे बाकी आहे. गंगापूरचा विसर्ग रात्रीतून नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होऊन हे पाणी जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत खाली प्रवाहित होणार आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 5304 दलघफू पाणीसाठा आहे.

दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी परिसरात पावसाचा जोर मंदावला होता. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील घोटीला 64, इगतपुरीला 89 तर दारणाच्या भिंतीजवळ 25 मिमी पावसाची नोंद झाली. भावली धरणातुनही विसर्ग 701 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने प्रवाहित होत असल्याने दारणात 907 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. यामुळे दारणातून 10486 क्युसेक ने विसर्ग सुरुच आहे. हा विसर्ग काल दिवसभर स्थिर होता. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 6616 दलघफू पाणीसाठा आहे. हे धरण 92.54 टक्के पाणी साठा स्थिर ठेऊन नवीन येणार्‍या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. काल सकाळी 6 पर्यंत दारणातुन सव्वा आठ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

दारणा नंतर कडवातून 1272, वालदेवीतुन 406 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. गंगापूर मधून ही आता विसर्ग सुरु झाला. हे सर्व पाणी खाली नांदूरमधमेश्वर मध्ये दाखल होत आहे. या बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 पासुन 12620 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. गंगापूरचे पाणी रात्री 10 नंतर दाखल होईल. त्यामुळे गोदावरीतील विसर्ग काहीसा वाढवून तो 13500 क्युसेक पर्यंत जावु शकतो. काल सकाळी 6 पर्यंत एकूण 14.5 टिएमसी इतक्या पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला आहे.

अन्य धरणांचे साठे असे- पालखेड 75.23 टक्के, कडवा 100 टक्के, मुकणे 69.45 टक्के, भोजापूर 100 टक्के, आळंदी 42.86 टक्के, कश्यपी 53.56 टक्के, वालदेवी 100 टक्के, गौतमी गोदावरी 64.05 टक्के, वाकी 64.50 टक्के, भाम 100 टक्के.

जायकवाडी 78 टक्के !

काल सायंकाळी जायकवाडीत 16378 क्युसेकने नविन पाण्याची आवक होत होती. या जलाशयातील उपयुक्त साठा 59.8 टीएमसी (59881 दलघफू) इतका झाला होता. तर मृतसह एकूण साठा 85.9 टीएमसी (85951 दलघफू) इतका झाला होता. हे धरण 78.09 टक्के इतके भरले होते. गोदावरी तसेच प्रवरेतून जायकवाडीच्या दिशेने पाणी दाखल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या