Friday, April 26, 2024
Homeनगर112 नंबरवर कॉल आला अन् 11 जुगारी पकडले

112 नंबरवर कॉल आला अन् 11 जुगारी पकडले

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शहरातील कायनेटीक चौकात तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना डायल 112 नंबरवर आली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी सदर ठिकाणी सोमवारी पहाटे छापा टाकून 11 जुगारी पकडले. त्यांच्याकडून 18 हजार 250 रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

- Advertisement -

पोलीस शिपाई संदीप थोरात यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 11 जुगारीविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साबीर असयुब शेख, फिरोज खान सुलेमान खान (दोघे रा. तख्ती दरवाजा), सचिन प्रभाकर परदेशी (रा. बुर्‍हाणनगर), सुरेश शिवदास ननवरे (रा. कायनेटीक चौक), मोसीन इसा मुद्दीन शेख (रा. आशा टॉकीज), सोफीया रऊफ शेख (रा. फलटन चौकी), जाहीद जाकीर शेख, निशांत राजू इनामदार (दोघे रा. मुंकुदनगर), अक्षय सुनील गायकवाड (रा. सारसनगर), अमित बाळासाहेब चिंतामणी (रा. तेलीखुंट), जावेद पिरमहम्मद सय्यद (रा. फकीरवाडा) अशी पकडलेल्या जुगारींची नावे आहेत.

रविवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार थोरात, मुरकूटे गस्ती पथकावर असताना डायल 112 नंबरवर फोन आला की, कायनेटीक चौकातील हायवे चाय टपरीच्या पाठीमागे काही इसम जुगार खेळत आहे. यानंतर पथकाने गुन्हे शोध पथकाचे रात्र गस्तीचे अंमलदार योगशे कवाष्टे, सुजय हिवाळे यांना सोबत घेऊन नमूद ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या