Saturday, April 27, 2024
Homeनगर‘गॅलॅक्सी’ वर कारवाईसाठी झेडपीत ठिय्या

‘गॅलॅक्सी’ वर कारवाईसाठी झेडपीत ठिय्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत शाळा बंद असून देखील पालकांकडून अवाजवी शुल्काची मागणी, शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केल्याबद्दल,

- Advertisement -

तर शिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशी समितीस सहा महिने उलटून देखील वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शाळेतील पालक व विद्यार्थ्यांनी जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात सदर शाळेवर कारवाई होण्यासाठी पालकांनी जोरदार निदर्शने केली. आम्हाला शिकायचयं, जे देत नाही त्याची फी घेऊ नका, न्याय द्या असे फलक घेऊन विद्यार्थी देखील आंदोलनात सहभागी झाले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत सर्व शाळा बंद होत्या. मुलांना फक्त ऑनलाईन शिक्षण देण्यात आले.

राज्य सरकारने देखील शाळांनी जास्तीची फी वसुली करू नये, याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, गॅलॅक्सी नॅशनल स्कूलने पालकांकडून इतर शुल्काच्या नावाखाली अवाजवी फी वसुली केली. पालकांनी करोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शालेय प्रशासनास फक्त ऑनलाईन शिक्षणाची फी देण्याची सहमती दर्शवली. शालेय प्रशासन आजही पालकांकडून करोना काळातील संपूर्ण वर्षाची पूर्ण फी भरून घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

फी भरू न शकलेल्या ओम गुंजाळ (इ. 8 वी) व जय गुंजाळ (इ. 6 वी) या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देखील बंद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सुचनांना देखील शालेय प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना देण्यात आले.

सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारपर्यंत सुरू होते. प्र. शिक्षणाधिकारी सय्यद यांनी गॅलॅक्सी नॅशनल स्कूलला शैक्षणिक शुल्क कमी करून, अधिकचे शुल्क पालकांना परत करण्याचे व ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठवेलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करून पूरक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे लेखी आदेश काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या