Sunday, May 5, 2024
Homeनगरजिरायती भागातील शेतकऱ्यांचे गडगे आदर्श - आ. विखे पाटील

जिरायती भागातील शेतकऱ्यांचे गडगे आदर्श – आ. विखे पाटील

राहाता | तालुका प्रतिनिधी

राहाता (Rahata) तालुक्यातील पिंपरी लोकाई (Pimpari Lokai) सुभाष गडगे हे प्रयोगशिल शेतकरी (Farmers) असुन जिरायती भागातील गावांना आदर्श ठरावी अशी शेती ते करत आहेत, असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

- Advertisement -

पिंपरी लोकाई या जिरायती भागातील शेतातील द्राक्षांच्या (grapes) काढणीस काल आमदार विखे पाटील व सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधीवत पुजनाने सुरुवात झाली. त्याप्रसंगी आमदार विखे पाटील बोलत होते.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

याप्रसंगी केलवडचे सुभाषराव गमे, माजी सरपंच उत्तमराव गाडेकर, सुभाषराव गडगे, शिवाजी वाघे, भारत राऊत, अनिल तारगे, पोपट गाडेकर, गोरख गाडेकर, जालिंदर गाडेकर, आप्पासाहेब गाडेकर, रविंद्र गाडेकर, जितेंद्र गाडेकर, विठ्ठल गडगे, नानासाहेब गडगे, रमेश गडगे, चांगदेव गडगे, मधुकर महाराज, सरपंच लक्ष्मण सोनवणे, माजी सरपंच लक्ष्मण गायकवाड, रविंद्र धात्रक, सचिन गाडेकर, सिताराम गायकवाड, मच्छिंद्र धात्रक, पोपट वर्‍हाडे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी शाहरुखनं नेमकं काय केले ज्याने तो एवढा ट्रोल होतोय?, नेमकं सत्य काय?

याप्रसंगी बोलतांना आमदार विखे पाटील म्हणाले, जिरायती टापूतील गाव आहे. कमी पाण्यात शेतकरी विविध पिके घेतात, आपण कृषी मंत्री असताने शेततळ्याची योजना आणली त्याचा फायदा या भागातील शेतकर्‍यांना झाला. सुभाष गडगे हे मिरच्या चांगले पिकवायचे, शेततळे उभारले, दोन खोल्या बांधल्या, पण आज स्वत: च्या कर्तृत्वाने, कष्टातुन त्यांची जिरायती भागात ६ एकर द्राक्षाची उत्तम बाग उभी आहे.

VIDEO : नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन, अजय-अतुलचे म्युझिक अन् बिग बींची स्टाईल; ‘झुंड’चा टीझर बघाच

पिंपरी लोकाईच नव्हे तर संपुर्ण जिरायती टापूला त्यांचे शेती ही आदर्श आहे. अनेक वर्ष दुष्काळात राहिलेले हे गाव आहे. आम्ही साईगंगा योजनेचे पाणी आणण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठ्यासाठी आडगाव पाणी योजनेला पिंपरी लोकाई जोडली. गावाने अनेक संकटे पाहिली. त्यातुन गावाने उभारी घेतली. सौ. शालिनीताई विखे जिप अध्यक्ष असताने त्यांनी शाळा खोल्या दिल्या. असे ही आमदार विखे पाटील म्हणाले.

महंत रामगिरी महाराज यांनी गडगे यांच्या द्राक्षे शेतीच्या प्रयोगाचे कौतुक करत टँकरने पाणी टाकुन बाग जगवली. शेतकरी कष्टाळु आहेत. प्रयोगशिल असल्याचे महंत रामगिरी महाराज म्हणाले.

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई सारख्या जिरायती भागात आमदार विखे पाटील राज्याचे कृषी मंत्री असताने शेततळे दिले. त्यांचे मोठे योगदान आहे. त्यातुन आम्हाला प्रेरणा मिळाला. पायरेन्सचे चांगले मार्गदर्शन मिळाले.

सुभाष गडगे, प्रयोगशील शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या