Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक शहरातील गॅबियन वॉल आणि आगळा-वेगळा जॉगिंग ट्रॅक

नाशिक शहरातील गॅबियन वॉल आणि आगळा-वेगळा जॉगिंग ट्रॅक

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रभाग क्र. २५ मधील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजन शिवसेना नेते खा. संजय राऊत (Shivsena MP sanjay raut) यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पत्रकार परिषदेत दिली….

- Advertisement -

नवीन नाशकातील त्रिमूर्ती चौक (Trimurti Chauk) येथील जनता तेल सेंटर (Janta oil Center) ते शिवशक्ती चौक (Shivshakti chauk) दरम्यानच्या नैसर्गिक नाल्यावर गॅबीयन भिंत (Gabion wall) बांधून त्यावर जॉगिंग ट्रॅक (Jogging Track) बनवण्याचा आगळा वेगळा प्रकल्प माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) व माजी नगरसेविका हर्षा बडगुजर (Harsha Badgujar) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला….

त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना (Shivsena) नेते खा. संजय राऊत यांच्या हस्ते (दि. १६ ) संपन्न होणार आहे.

या सोबतच प्रभाग क्र. २५ मधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे लोकार्पण त्यामध्ये पाटील नगर उद्यान ते सुभाषचंद्र बोस उद्यान रस्ता,शिवानंद चौक ते जुने स्वाध्याय केंद्र पाटील नगर,जयाजी संकुल ते सायखेडकर हॉस्पिटल,त्रिमूर्ती चौक ते नाईक मळा पाटील नगर या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

यासोबतच पाटील नगर मैदान, पाटील नगर उद्यान, सुभाषचंद्र बोस उद्यान, नागेश्वर मंदिर उद्यान, रायगड चौक मनपा शाळा,याठिकाणी सुमारे ११६ सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवण्यात आले आहेत त्याचे लोकार्पण तर पेठे विद्यालय (pethe highschool) ते तोरणा नगर (Torna Nagar) रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन सोहळा खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या