Friday, April 26, 2024
Homeनगरबुरशीजन्य आजाराने कडुनिंबास ग्रासले

बुरशीजन्य आजाराने कडुनिंबास ग्रासले

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshumkh

कडुलिंबाचे झाड प्रदूषण, जंगलतोड, मातीची धूप आणि वाढते तापमान यासारख्या प्रमुख जागतिक समस्या दूर करू शकते. कडुलिंब हे एक सदाहरित पानझडी वृक्ष आहे जे जागतिक पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी ओळखले जाते. परंतु ते स्वतः सूक्ष्मजीव रोगांपासून मुक्त नाही. सध्या कडुनिंबाचे झाडांचे शेंडे जळुन जात आहेत.

- Advertisement -

अतिशय कमी पाण्यात कोणत्याही वातावरणात वाढणारे व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदुषणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवणारे झाड म्हणून या झाडाची ओळख आहे. परंतु हे झाड आता बुरशीयुक्त आजाराने ग्रासले आहे. गेल्या सहा महिन्यापासून शेंडे जळालेली झाडे दिसण्याचे प्रमाण दररोज वाढतांना दिसत आहे. कडुिंनंब या झाडाची फळे, बिया, पाने, साल, अगदी मुळे सुद्धा कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे या झाडाची तुलना औषधी कल्पवृक्ष अशी केली जाते. कडू असल्यामुळे जंतुनाशक हा याचा प्रमुख गुणधर्म आहे. मानव, पशु-पक्षी, पिकें, या सर्वांसाठी हे झाड एक प्रकारे वरदानच आहे.

या झाडाचे सांस्कृतिक महत्वही मोठे आहे. विशेष म्हणजे हे झाड ऑक्सिजनचा खूप मोठा स्रोत आहे. त्यामुळे या झाडापासून प्रदूषण कमी करण्यात मोलाची मदत होते. आजपर्यंत कधीच या झाडावर मोठ्या प्रमाणावर रोग आल्याचे कधीच दिसले नाही असे जुने जाणकार सांगतात, मात्र या वर्षी हा रोग पावसाळ्यापासुन जास्त प्रमणात दिसयाला लागला आहे. या झाडांची पाने शेंडे जळण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सर्वाधिक झाडांची शेंडे जळण्यास सुरुवात झाला आहे. आता हे प्रमाण फारच वाढले आहे. तर काही झाडे जळाली आहेत.

कडुनिंबाच्या डहाळ्यांना डायबॅकची लागण फोमोप्सिस अझाडिरॅक्टा मुळे होते. या रोगाने सर्व वयोगटातील आणि आकारांची झाडे प्रभावित होत आहे. यापूर्वी इतर काही राज्यात या प्रकारचा झाडांना आजार आला होता.वातावरणातील बदलामुळे झाडे ह्या आजाराला बळी पडत आहे. फोमोप्सिस अझाडिरॅक्टा रोगजनक बुरशीमुळे हा रोग होतो. फोमोप्सिस अझाडिरॅक्टा ही एक बुरशी आहे.कडुनिंब, बीजजन्य आणि बीज प्रसारित दोन्ही आहे. जी फोमोप्सिस वंशाची एक प्रजाती आहे. बुरशीमुळे कडुनिंबाच्या झाडाची पाने आणि फांद्यावर परिणाम होतो. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाविस्टिनची फवारणी कडुलिंबाच्या झाडांवर करता येते. याचा इतर राज्यात चांगला फरक दिसून आला आहे.

– डॉ. कांतीलाल वक्ते (वनस्पती शास्त्र अभ्यासक)

- Advertisment -

ताज्या बातम्या