Saturday, April 27, 2024
Homeधुळेशिरपूर तालुक्यात रस्त्यांसाठी 24.37 कोटी निधी मंजूर

शिरपूर तालुक्यात रस्त्यांसाठी 24.37 कोटी निधी मंजूर

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

माजी मंत्री अमरिशभाई पटेल व जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या प्रयत्नाने नवीन रस्त्यांसाठी

- Advertisement -

24.37 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे तालुक्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर होत्या.

पावसाळ्यात शेतकरी बांधवांना आपल्या शेतापर्यंत बी-बियाणे, खत तसेच बाजारपेठेपर्यंत दळणवळणाकरीता अडचणी निर्माण होत होत्या.

या सर्व समस्यांचा मागोवा घेत माजी मंत्री अमरिशभाई पटेल व जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी रस्त्यांबाबतची दुरावस्था शासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच वेळोवेळी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला.

शिरपूर तालुक्यातील अर्थे भरवाडे ते टेंभे रस्ता 3.55 कोटी रुपये, एस एच 12-ते पाथर्डे ते बाळदे रस्ता 1.97 कोटी रुपये, गोदी ते थाळनेर रस्ता 5.99 कोटी रुपये, एम. डी. आर. 12 ते अजनाड रस्ता 2.74 कोटी रुपये, ओ डी आर 38 (चांदसे) ते वाडी रस्ता 1.39 कोटी रुपये, विखरण ते भामपूर रस्ता 3.91 कोटी, एन एच 3- ते पिंपरी आढे रस्ता 1.20 कोटी रुपये, हाडाखेड ते हिंगोणी लौकी रस्ता 3.62 कोटी रुपये खर्चाचे हे नवीन रस्ते मंजूर केले.

यासाठी नंदुरबार लोकसभा खा. डॉ. हीना गावित, आ. काशीराम पावरा यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या