Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमकर संक्रांतीपासून श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन अभियान

मकर संक्रांतीपासून श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन अभियान

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीने वेग घेतला असून मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तापासून निधी समर्पण अभियानास प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रात हे अभियान ३१ जानेवारी पर्यंत सुरु राहिल.

- Advertisement -

या अभियानात महाराष्ट्रातील 40 हजार गावांमधील दीड कोटी कुंटुबियांपर्यत पोहोचणार आहे. तर नाशिक जिल्ह्यात चार लाख कुटूंबापर्यत पोहचण्याचा मानस आहे. मंदिरासाठी निधी देणे ऐच्छिक असून प्रत्येक रामभक्ताने या अभियानात सहभागी होऊन या राष्ट्रनिर्मिती कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. डाॅ. कुर्तकोटी सभागृहात शनिवारी (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संघाचे विभाग संघचालक कैलास सांळूके, विश्‍व हिंदू परिषदेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष विराज लोमटे, जिल्हा अभियान प्रमूख विनोद थोरात, तुकाराम मांडवडे, देविदास वारूंगसे आदी उपस्थित होते. संपूर्ण देशात रामजन्म भूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यत निधी संकलन अभियान संपुर्ण देशभर होत आहे.

या माध्यमातून देशातील चार लाख गावे तसेच ‍११ कोटी कुंटूबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. न्यासाच्या वतीने पावती पुस्तके व १०, १०० व हजार रूपयांच्या कुपन तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय ऑनलाईन निधी समर्पण करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले.

असे असेल मंदिर

न्यायलयाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली आहे. प्रस्तावित निर्माणाधीन मंदीर तीन मजल्यांचे आहे. त्यात प्रत्येक मजल्वाची उंची २० फूटांची असेल, मंदीराची एकूण उंची १६१ फूट असेल, लांबी ३६०फूट आणि रूंदी २३५ फूट राहील. त्यावर पाच शिखर असलेले मंदिर होईल.

त्यांचे संपूर्ण बांधकम केवळ दगडांनी असेल लोखंडाचा वापर यात होणार नाही. मंदीर परकोटाच्या बाहेर यज्ञशाळा सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शनी,अतिथी भवन आदी सर्व अत्याधुनिक सोई सुविधा होतील.एकूण तीन ते साडे तीन वर्षाच्या कालावधीत भगवंत गर्भगृहात स्थानापन्न होतील, अशी अपेक्षा आहे.

श्रीराम मंदिरासाठी देशाती सर्वच राज्य आपले योगदान देणार आहे. परंतू सर्व राज्यांमधून महाराष्ट्रातून सर्वाधिक निधी जाईल, अशी अपेक्षा आहे. श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने नाशिकची भूमी पावन झाली आहे. त्यामुळे राज्यातुन नाशिक जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात निधी समर्पित होणार आहे. सर्वाच्या सहभागाने मंदिरांची निर्मिती होत असल्याचे तो मोठा आंनद असल्याचे ह. भ. प. महामंडलेश्‍वर महंत रामकृष्ण महाराज लहवीतकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या