Thursday, April 25, 2024
Homeनगरवित्त आयोगाचा निधी अन् मोदी साहेबांचे नोटा छापण्याचे मशीन..!

वित्त आयोगाचा निधी अन् मोदी साहेबांचे नोटा छापण्याचे मशीन..!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत (Zilla Parishad general meeting) 45 रुग्ण वाहिकांच्या (Ambulance) विषयाला मंजुरी देण्यावरून बराच वादंग (Controversy) झाला. यावेळी संबंधीत रुग्णवाहिकांचा (Ambulance) आकार, त्यांचे इंधन मायलेज आणि किंमतीवरून सदस्यांनी काथ्याकूट केला. त्यात सदस्य जालींदर वाकचौरे (Jalidar Wakchaure) यांनी रुग्णवाहिका (Ambulance) या केंद्राच्या वित्त आयोगाच्या निधीतून (Funds from the Central Finance Commission) घेतल्या असल्याचे सांगत असतांना सदस्य अजय फटांगरे (Ajay Phatangare) यांनी केंद्राचा निधी (Central Fund) म्हणजे आपण दिलेल्या जीएसटीचा पैसा आहे. त्याच (GST) पैशातून आपल्याला केंद्राकडून निधी मिळतो. मोदी साहेबांकडे (PM Narendra Modi) पैसे छापण्याची मशिन (Money printing machine) ठेवली का? असे म्हणताच भाजप सदस्य आक्रमक (BJP members aggressive) झाले. यावरून बराच वादंग झाला.

- Advertisement -

सभेत जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांच्या (Ambulances procured by Zilla Parishad) विषय मंजूरीला होता. यावेळी जालींदर वाकचौरे (Jalidar Wakchaure) यांनी खरेदी केलेल्या रुग्णवाहीकांचा आकार मोठा असून त्यांचे मायलेज कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे डिझेलचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर सभापती सुनील गडाख (Sunil Gadakh) यांनी घेतलेल्या रुग्णवाहिकांचा फायदा प्राथमिक आरोग्य केंद्रांना होत असून वाकचौरे यांनी या विषयाकडे नाकारात्मक पध्दतीने पाहू नयेत. त्यावर वाकचौरे (Jalidar Wakchaure) यांनी रुग्णवाहिकांना वापरलेला पैसा हा 14 व्या वित्त आयोगातील व्याजाच्या रक्कमेतील असतांना या रुग्णवाहिकांचे लोकापर्ण करतांना राजकीय पक्षालासमोर करण्यात आले आणि त्याचे फोटो काढण्यात आले. या विषयावर सदस्य राजेश परजणे (Rajesh Parjane) आक्रमक होते.

दरम्यान, सभापती गडाख (Sunil Gadakh)आणि वाकचौरे (Jalidar Wakchaure) यांच्या शाब्दिक खडाजंगी सुरू असतांनाच सदस्य फटांगरे (Ajay Phatangare) यांनी या रुग्णवाहिका देतांना त्यांच्या प्राधान्यक्रम कसा ठरवला, याची माहिती विचारली. याच दरम्यान, त्यांनी केंद्राचा निधी, केंद्राचा निधी असे सारखे म्हणणारे वाकचौरे (Jalidar Wakchaure) यांना केंद्राचा निधी म्हणजे आपण दिलेल्या जीएसटीच्या (GST) पैशातून आपल्याला निधी मिळतो. मोदी (PM Narendra Modi) साहेबांकडे पैसे छापण्याची मशिन ठेवली का? असे म्हणताच सभागृहात हश्या पिकाला आणि भाजप सदस्य आक्रमक झाले. सदस्य परजणे (Rajesh Parjane), वाकचौरे (Jalidar Wakchaure) यांनी मोदी (Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान (PM) आहेत. राजकारण हे राजकारणाप्रमाणे व्हावे, अशी मागणी केली. तर सभापती गडाख (Sunil Gadakh) यांनी शिष्टाई करत फटांगरे यांच्याकडून अनावधनाने मोदी (Narendra Modi) साहेबांचे नाव आले असून हा शब्द सभेच्या कामकाजातून काढण्याची सुचना केली आणि विषयावर पडदा पडला.

त्या महिला सदस्य उपाशीच…!

सभेत उशीरा आलेल्या चार ते पाच महिला सदस्यांनी मागणी करून आयोजकांनी त्यांना जेवण उपलब्ध करून दिले नाही. अखेर ही बाब सदस्य परजणे यांच्या लक्षात येताच त्यांनी आक्रमक रुप धारण केले. अध्यक्षा घुले यांनी सदस्यांना जेवण न देणार्‍यांवर संबंधीतांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर काही मिनीटात सभा संपली आणि उपाशीपोटी त्या महिला सदस्य सभागृहातून बाहेर पडल्या.

आम्हाला पण चहा द्या- कातोरे

पावसाळी दिवस अन् सभागृहात कडक एसी यामुळे सभेच्या सुरूवातील चहाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, मागणी करून ही चहा न मिळाल्याने सदस्य एस. एम. कातोरे चिडले. दुसरीकडे पदाधिकार्‍यांना दोन चहा दिल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आम्हाला पण चहा द्या, अशी जाहीर मागणी केल्यानंतर सभागृह खळखळून हसले. निधी नाही, तर चहा तरी द्या, अशी सामुदायिक प्रतिक्रिया यावेळी उमटली. तर सदस्य जालींदर वाकचौरे जेवण करतांना पोळी मागितल्यावर अर्धा तासानंतर देखील पोळी न मिळाल्याने अर्ध उपाशी पोटी हात धुतल्याचे सांगताच पुन्हा खसखस पिकली.

- Advertisment -

ताज्या बातम्या