Thursday, April 25, 2024
Homeनाशिकयेवल्यातील नागरी सेवा व सुविधांसाठी 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

येवल्यातील नागरी सेवा व सुविधांसाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

नाशिक । Nashik

येवला मतदारसंघाचे (Yeola constituency) आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला (Yeola) शहरात नागरी सेवा व सुविधांच्या विविध १३ विकासकामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी (Funding) मंजूर करण्यात आलेला आहे. या माध्यमातून रस्ता काँक्रीटीकरण, भूमिगत गटार, वाणिज्य संकुल यासह विविध नागरी सेवा व सुविधांची विकासकामे करण्यात येणार आहे…

- Advertisement -

नागरी सेवा व सुविधांच्या या कामांमध्ये येवला शहरातील (yeola city) लक्ष्मीआई मंदिर ते नागड दरवाजा रोड-नांदगाव रोड, रस्त्या डांबरीकरण व कॉक्रीटीकरण करणे व अनुषंगिक गटार बांधकाम करण्यासाठी ७० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नाशिक महामार्ग विंचूर रोड पाणी टाकी ते पारेगाव रस्त्या पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी १ कोटी ८० लक्ष, डॉ . बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर समोर भूमिगत गटार करण्यासाठी २० लक्ष, पारेगाव रोड भागात भूमिगत गटार बांधकाम करणे व अनुषंगिक रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

तसेच कै. भाऊलाल पहिलवान लोणारी व्यापारी संकुल परिसरातील रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष, जुनी नगर परिषद रस्ता ते म.रा.वि.मं कंपनी ऑफिस ते सुंदर नगर पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, येवला शहरातील २४.०० मीटर रुंद रस्त्यालगत डॉ . साळुंखे हॉस्पिटल ते गाडेकर यांचे घर ते कलावती आई मंदिरापर्यंत जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत कॉक्रीटीकरण करणे व भूमिगतगटार बांधकाम करण्यासाठी ३५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे.

त्याचबरोबर येवला शहरातील सोमनाथ गुंड ते जगदाळे वस्ती पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी १० लक्ष, गवंडी गल्ली भागात रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी २० लक्ष, हमाल गल्ली भागात रस्ता काँक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार करण्यासाठी २० लक्ष, म्हसोबा नगर स. नं. १४ पैकी मधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगतगटार बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, जाईचा मारुती तालीम ते संभाजी जेजुरकर यांचे घरापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, जुनी नगरपालिका इमारत सिटी सर्व्हे क्र . ४५३६ ते ४५४२ येथे वाणिज्य संकुल बांधणे तसेच इतिहास संग्रहालय व अनुषंगिक कामे करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या