Thursday, April 25, 2024
Homeधुळेअमळनेर न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीला १२ तासाच्या आत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमळनेर न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीला १२ तासाच्या आत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धुळे – dhule

जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील (amalner) अमळनेर न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीला (dhule) धुळे तालुका (police) पोलिसांनी 12 तासांच्या आतच बेडया ठोकल्या. त्याला मंदिर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisement -

राजेश एकनाथ निकुंभ (रा.अमळनेर जि.जळगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. काल त्याला पोलिसांनी अमळनेर न्यायालयात हजर केले होते. त्यादरम्यान त्याने पोलीस रखवालीतून पलायन केले. त्यांच्यावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा आरोपी फागणे परिसरात आल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्याला अमळेनर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे (Nashik Range) विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील (BG Shekhar Patil), पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil), अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, असई सुनिल विंचुरकर, पोहेकॉ प्रविण पाटील, पोना अविनाश गहीवड, पोकॉ धिरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या