Friday, April 26, 2024
Homeनगरइंधन दरवाढीचा शेतकर्‍यांना फटका; महागाई वाढली

इंधन दरवाढीचा शेतकर्‍यांना फटका; महागाई वाढली

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

लॉकडाऊननतंर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच इंधनासह जिवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.

- Advertisement -

यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. सरकारने एका हाताने दिले व दुसर्‍या हाताने काढून घेतल्याने गगनाला भिडलेल्या महागाईने सर्वसामान्याचे कंबरडेच मोडले आहे.

70 ते 80 रुपया वरुन पेट्रोल, डिझेलचे दर वाढत-वाढत जाऊन आज पेट्रोल 94 रुपये लिटर व डिझेल 84 रुपये झाले आहे. इंधनाची दरवाढ शंभरीकडे सुरु आहे. याचा माल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. माल वाहतुकीचे दर वाढले आहेत. याचा परिणाम जिवनावश्यक वस्तूवर झाला आहे. 80 रुपये किलो असणारे शेंगादाणे 120 रुपये किलो, 70-80 रुपये असणारे सोयाबीन तेल तडक 140 रुपये किलो झाले आहे.

हीच अवस्था बेसनपीठ, पोहे, डाळी, चहा, धुण्याच्या साबणी, मसाले, तूप आदी जिवनावश्यक वस्तूची झाली आहे. कधी नव्हे ते महागाईचा भडका इतक्या मोठा प्रमाणात उडाला आहे. साखर सोडून इतर सर्व वस्तूचे दर डब्बल झाले आहेत. या तुलनेत शेतमालाचे दर मात्र, पडलेले आहेत. भाजीपाला पुन्हा एकदा निच्चांकी भावावर आला आहे. कोबी रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

सरकारने लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोफत धान्य दिले. जनधन खात्यावर 500 रुपये दिले. यामुळे जनता खुष झाली. परंतु इंधन दरवाढी बरोबरच जिवनावश्यक वस्तूची दरवाढ करुन केलेले उपकार कधी काढून घेतले, हे जनतेला समजले नाही. या आधी सरकारने गोरगरीबांच्या झोपडीतील दिवा रॉकेल बंद करुन विझवून टाकला. आता इंधनासह जिवनावश्यक वस्तूंची दरवाढ करुन सर्व सामान्याचे कंबरडेच मोडून टाकल्याने तो या महागाईच्या भस्मासूरात कसा उभा राहणार? हा खरा सवाल या निमित्ताने सर्वसामान्य नागरिक करताहेत.

घरगुती गॅससाठी सबसिडीचे गाजर दाखवून ही सबसिडी लॉकडाऊनपासून बंद झाली आहे. दुसरीकडे गॅसच्या देखील किंमती आकाशाला भिडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे तेलबियांचे उत्पादन कमी झाल्याचे कारण सांगून व्यापार्‍यांनी तेलाच्या किंमती भरमसाठ वाढविल्या. परंतु सोयाबीन खरेदी करताना शेतकर्‍यांना चार हजाराच्या आतच भाव दिला. तर दुसरीकडे अचानकपणे सरकी पेंडीचे भाव क्विंटलमागे तिनशे रुपयांनी वाढल्याने दूध उत्पादकांचे देखील बजेट कोलमडले आहे. यामुळे ‘आंधळी नगरी चौपट राजा’ अशी ही स्थिती झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या