Thursday, April 25, 2024
Homeजळगावबी-बियाणे विक्रेत्यांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा,लस पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

बी-बियाणे विक्रेत्यांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा,लस पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

रावेर – Raver – प्रतिनिधी :

कृषि निविष्ठा विक्रेते व त्यांच्या कर्मचा-यांचे फ्रंट लाईन वर्कर म्हणुन प्राधान्यांने लसीकरण करण्यासाठी कृषी आयुक्तांनी आदेश काढल्याने माफदा अध्यक्ष विनोद तराळ यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

- Advertisement -

कृषी आयुक्त यांच्याकडे माफदा अध्यक्ष विनोद तराळ व संघटनेचे पदाधिकारी यांनी बी-बियाणे विक्रेत्यांचा अनेक शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने,खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने, शेतक-यांना आवश्यक असणा-या,कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध करण्यासाठी सर्व कृषि विक्री केंद्र चालू ठेवणे क्रमप्राप्त आहे.

कृषि निविष्ठा विक्री केंद्रे ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने,कृषी केंद्र चालक व त्यांचे कर्मचारी यांचा शेतकऱ्यांशी येणाऱ्या संपर्काचे प्रमाण जास्त आहे.त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

करोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभुमीवर,कृषि केंद्र चालकांना कृषि निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत,वितरकांच्या माफदा- पुणे या राज्यस्तरीय संघटनेबरोबर व्हीसीद्वारे झालेल्या सभेत, बरेचसे केंद्र चालक व कर्मचारी हे कोरोना बाधित होण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होती.

त्या अनुषंगाने केंद्र चालक व त्यांच्या कर्मचार्यांना फ्रंट वर्करचा दर्जा देऊन लसीकरण केले जाणार असल्याने,बी बियाणे,रासायनिक खते, कीटकनाशके विक्रेत्या संघटनेच्या वतीने माफदा अध्यक्ष विनोद तराळ यांचे आभार व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या