Sunday, May 5, 2024
Homeनगरमित्राचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवकाला मारहाण

मित्राचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवकाला सात ते आठ जणांनी हत्याराने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी तारकपूर रोडवर घडली. रामनाथ उर्फ रितेश संजय गायकवाड (वय 17 रा. पवननगर, भिस्तबाग चौक) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आर्यन शेख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व इतर सात ते आठ अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीचा मित्र स्वराज हापसे (रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) याचे काही मुलांसोबत वाद झाले होते. ते वाद मिटवण्यासाठी रविवारी दुपारी फिर्यादी डीएसपी चौक येथे गेले होते. यानंतर ते तारकपूर रोडने मिस्कीन मळ्याकडे जात असताना चिनी मेन्स वेअर जवळ सात ते आठ जणांनी फिर्यादीला अडविले. स्वराज कुठे गेला असे म्हणत, फिर्यादीला कोणत्यातरी हत्याराने डोक्यात मारहाण करून जखमी केले. फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून मारहाण करणारे तेथून पसार झाले. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या