Friday, April 26, 2024
Homeनगरशुक्रवारी ईद-ए-मिलाद कार्यक्रमाचे आयोजन

शुक्रवारी ईद-ए-मिलाद कार्यक्रमाचे आयोजन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

रविवारी (दि.18) चंद्रदर्शन झाल्याने हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण येत्या

- Advertisement -

शुक्रवार दि. 30 ऑक्टोबरला शहरात आणि तालुक्यात साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात जयंतीची जय्यत तयारी पाहावयास मिळत आहे. यावेळी मिरवणूक होणार नसून गरीब नवाज फौंडेशनचेही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शहरातील वॉर्ड 2 मधील सय्यद बाबा दर्गाह परिसर, वेस्टन चौक, मौलाना आझाद चौक, फतेह चौक, काजीबाबा दर्गाह परिसर, सुलतांन नगर, प्रांत कार्यालयामागील हुसेननगर, कुरेशी मोहल्ला, गुलशन चौक, मिल्लतनगर, फातेमा हाऊसिंग सोसायटी, गोंधवणी रोड,)अशा विविध भागात ठिकठिकाणी घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मिल्लतनगरमधील मस्जीद ए मुसा वर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी सलग बारा दिवस होणारे प्रवचनमाला करोनामुळे रद्द करण्यात आले आहे.

ईद-ए-मिलादनिमित्त श्रीरामपूर शहर आणि बेलापुर, एकलहेरे, टिळकनगर, पढेगाव, टाकळीभान अशा ठिकाणी सजावटीच्या कामाला वेग आला आहे.

30 ऑक्टोबरला पैगंबर जयंती जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलुस (मिरवणूक) निघणार की नाही ? यावर्षी ही मिरवणूक होणार नाही, अशी माहिती जामा तसेच मक्का मस्जीदचे मुख्य विश्वस्त शकुरभाई शेख व नजीरभाई मुलाणी यांनी दिली.

शहरातील गरिब नवाज फाऊंडेशन दरवर्षी या ईद-ए-मिलाद निमित्त प्रसिद्ध कव्वाल, सामूहिक विवाह आणि शहरात ठिकठिकाणी मोठमोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यामुळे चैतन्य निर्माण होते. मात्र करोंनामुळे यंदा हे कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक मुख्तार ताहेर शाह यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या