Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंदा रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे डबे घसरले

श्रीगोंदा रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे डबे घसरले

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

पहाटे श्रीगोंदा स्टेशनपासून अगदी नजीक तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून नगरच्या दिशेने मनमाडला जाणाऱ्या

- Advertisement -

मालवाहतूक रेल्वेचे १२ डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. मालवाहतूक करणारी रेल्वे असल्याने कोणतीही जीवीतिहानी किंवा कुणीही यात जखमी झालेले नाही.

अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत. सिमेंट वाहतूक करणाऱ्या या मालवाहतूक गाडीला ४२ डबे होते. त्यातील १२ डबे रुळावर घसरले. सदर घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या पो उपनिरीक्षक गट व पो. कॉ प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही वेळेसाठी ठप्प राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या